खाकीतही माणुसकीचा झरा ! : जखमी हरणाच्या पिलाला दिले जीवदान !


भुसावळ : पोलिसातही माणसुकीचा झरा ओतप्रोत असल्याचा प्रत्यय भुसावळकरांना मंगळवारी झाला. कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या हरणाच्या पिलावर तातडीने उपचार करून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे एएसआय तस्लीम पठाण यांनी माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देत जिल्हा पोलिस दलाचीही मान उंचावली.

पोलिस कर्मचार्‍याची अशीही भूतदया
झाले असे की, बाजारपेठचे एएसआय तस्लिम पठाण हे मंगळवारी खाजगी कामासाठी जळगांव गेले असता परतीच्या प्रवासात साकेगाव शिवाराजवळ कुत्र्यांच्या हल्ल्यात हरणाचे पिलू जखमी असल्याची माहिती त्यांना निकटवर्तीयांनी दूरध्वनीद्वारे दिली. त्यांना लागलीच घटनास्थळी धाव घेत जखमी हरणाच्या पिलाला भुसावळातील यावल रस्त्यावरील पशुवैद्यकिय दवाखान्यात उपचारार्थ हलवले तसेच यावल नाक्यावरील जळगाव वन विभागाच्या तपासणी नाक्यावरील वनरक्षक डी.जी.रायसिंग यांना याबाबतची माहिती कळवली. तातडीने प्रथमोचार मिळाल्याने हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळाल्याने पठाण यांच्या सहृदयतेचे पोलिस दलातून कौतुक करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !