जागतिक विक्रम : अंतराळात झेपावले 100 उपग्रह
जागतिक विक्रमात भुसावळातील 11 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सहभाग
भुसावळ : डॉ. एपीजेअब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारे आयोजित ‘स्पेस रिसर्च पेलोड क्यूब्ज चैलेंज 2021’मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 100 लघू उपग्रहांचे रविवारी, 7 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता रामेश्वरम येथून ‘हाय अल्टीट्युड सायन्टिफिक हेलियम बलून’द्वारे प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे या जागतिक विक्रमात भुसावळातील 11 बालवैज्ञानिकांचा सहभाग राहिला.
या विद्यार्थ्यांचा सहभाग
शहरातील नाहाटा महाविद्यालयातील शिवम शैलेंद्रकुमार भंगाळे, वैभव नामदेव रत्नपारखी, सागर सचिन सरोदे, खुशाल शरद पाटील तसेच के.नारखेडे विद्यालयातील समीक्षा नितीन पाटील, पोदार इंटरनॅशनल स्कूल मधील अर्णव नितीन पाटील, प्रणव दीपक महाजन, याबरोबर सोहम राजेश वाणी, नेत्रज प्रशांत चौधरी, सुमित गजानन निवे, जिया जावेद तडवी या 11 बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांची टिम होती.
भुसावळातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या डॉ.भाग्यश्री शैलेंद्रकुमार भंगाळे व के.नारखेडे विद्यालयाचे नितीन पाटील हे मार्गदर्शक सहभागी झाले.


अवकाशात एकाचवेळी झेपावले शंभर उपग्रह
जगातील सर्वात कमी 25 ते 80 ग्रॅम वजनाचे 100 उपग्रह बनवून त्यांना 35 ते 38 हजार मीटर उंचीवर ‘हाय अल्टीट्युड सायन्टिफिक हेलियम बलून’द्वारे स्थापीत करण्यात आले. या उपग्रह ग्रहाची बांधणी कंपोझिट मटेरीयलमध्ये करण्यात आली. यामध्ये सेन्सर्स, जीपीएस ट्रेकिंग, लाईव्ह कॅमेरा जोडण्यात आला. प्रत्यक्ष ओझोन, कॉस्मिक किरण, अल्ट्राव्हायोलेट किरण, सूर्याची तीव्रता, नायट्रेट हवेचा वेग, बलून उपग्रहाचा वेग, गायरो मीटर, ऑक्सिजन ,कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड तसेच हवेची शुद्धता, ग्लास, फायबर, कार्बन फायबर इत्यादी सेन्सरचा उपयोग करण्यात आला. दरम्यान, काही झाडांचे बीजही अंतराळात पाठवण्यात आली यामुळे अवकाशातील शेती करण्याच्या संशोधनास मदत होणार आहे.