घरातून 30 हजारांची रोकड लांबवली : वाहन चालकासह अटक
भुसावळ : व्याजाच्या पैशांसाठी बाहेरगावी गेलेल्या महिलेच्या घराचा दरवाजा तोडून 30 हजार रूपये चोरून नेल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात बाजारपेठ पोलिसांनी संशयित इमरान शेख याला मंगळवारी अटक केली. तो आरपीआय जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांचा वाहनचालक आहे. 17 जानेवारीला ही चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी संशयीत आरोपी म्हणून किशोर सूर्यवंशी, इम्रान शेख व अन्य दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

