डांभूर्णी पोलिस पाटलाची दुचाकी जाळली


यावल : तालुक्यातील डांभूर्णी येथील पोलिस पाटील यांची दुचाकी अज्ञात इसमाने जाळल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी येथील पोलिसांत अज्ञात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डांभूर्णीचे पोलिस पाटील किरण भास्कर कचरे यांच्या फिर्यादीनुसार, गावातील प्रत्येक घडामोडी, वादविवाद हे पोलिस ठाण्यास ते कळवतात. त्यांच्या याच गोष्टीचा राग येऊन दोन अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास कचरे यांच्या घराबाहेर लावलेली 50 हजार रुपये किमतीची दुचाकी पेटवली. हा प्रकार त्यांच्या घराशेजारी राहणारे राजेंद्र फालक यांच्या निदर्शनास आला. त्यांनी कचरे यांना याबाबत माहिती दिली. त्यांच्या घराजवळ लावलेल्या दुचाकी जवळ दोन जण आले होते व त्यांनी दुचाकी पेटवून दिल्याचे राजेंद्र फालक यांनी सांगितले. त्यामुळे दोघा अज्ञात व्यक्तीविरुद्ध येथील पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !