मुक्ताईनगरात प्राध्यापकांच्या पूत्राची आत्महत्या


मुक्ताईनगर : शहरातील अष्टविनायक कॉलनीत रहिवासी व संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा.पी.एम.सोनवणे यांचा एकुलता एक मुलगा असलेल्या राहुल प्रकाश सोनवणे (25) याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. मुक्ताईनगर पोलिसात दीपक तुळशीराम जयकर यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत तरुणाच्या पश्‍चात विवाहित बहिण, आई-वडील असा परीवार आहे. तपास एएसआय सादीक पटवे करत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !