बेरोजगारांना रोजगाराची लवकरच संधी : श्रीराम पाटील


रावेर : श्रीराम समूह नवीन प्लांटवर काम करीत असून लवकरच बेरोजगार युवकांना रोजगार मिळणार असून येत्या काही महिन्यात काम पूर्ण झाल्यानंतर या परीसरातील युवकांना रोजगार देणार असून तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ जीवनात महत्वाचा घटक असून स्वत:च्या भविष्याकडेही मुलांनी लक्ष द्यावे व जीवनात यशस्वी होण्यासाठी परीश्रम सर्वात महत्वाचे असल्याचे विचार उद्योजक श्रीराम पाटील यांनी सांगितले. पातोंडी, ता.रावेर येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील बोलत होते. रावेर तालुक्यातील अनेक युवकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

यांची होती उपस्थिती
यावेळी क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला पातोंडी येथील सरपंच मोहन बोरसे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, प्रगतीशील शेतकरी श्रीराम गबाजी पाटील, लक्ष्मण कालू पाटील, रमेश कचरे, विनोद पाटील, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, मगन पाटील, योगराज महाजन, मगन पाटील, गणेश बोरसे, विलास ताठे, ललित चौधरी, चेतन पाटील आदी उपस्थित होते.


शिवजयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन
तालुक्यातील पातोंडी येथे शिवजयंतीनिमित्त क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत विजेत्या क्रिकेट टिमला श्रीराम फांउडेशनतर्फे प्रथम पारीतोषिक देणार येणार आहे. यावेळी उद्योजक श्रीराम पाटील यांच्याहस्ते येथील स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी एक ओव्हर खेळत श्रपाटील यांनी क्रिकेटच्या मैदानात चांगलेच फटके मारत स्पर्धेचे उद्घाटन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !