रावेर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदाचा पदभार रवींद्र पाटील यांच्याकडे


रावेर : रावेर पंचायत समितीच्या प्रभारी सभापती पदाचा पदभार बुधवारी जळगाव शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला असून हा पदभार त्यांच्याकडे पाच दिवसांसाठी असणार आहे. रावेर पंचायत समिती सभापती जितेंद्र पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिला परंतु नवीन सभापती होण्यास विलंब होत असल्याने बुधवारी जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील यांनी रावेर पंचायत समितीच्या प्रभारी सभापतीपदी पाटील यांची नेमणूक केली.

15 रोजी होणार सभापती निवड
रवींद्र पाटील यांनी बुधवारी रावेर पंचायत समितीमध्ये येऊन सभापती पदाचा पदभार स्विकारला. यावेळी त्यांचा रावेर भाजपातर्फे सत्कार करण्यात आला.जि.प.सदस्य कैलास सरोदे, माजी सभापती जितु पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, प्रा.सी.एस.पाटील, संजय माळी आदी उपस्थित होते. गुरुवारी ते रावेर पंचायत समितीची आढावा बैठक घेणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !