साडेचार वर्षांपासून झोपलेल्यांना निवडणूक तोंडावर आली जाग
भुसावळातील बैठकीत माजी आमदार संतोष चौधरींचा टोला : वरणगाव पालिकेवरही राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास
भुसावळ : भुसावळात पालिका निवडणूक तोंडावर आल्याने अनेक जण साडेचार वर्षांपासून झोपले होते मात्र आता त्यांना जाग आली असून अशांना मात्र जागा दाखवायची आहे, असा टोला माजी आमदार संतोष चौधरी यांनी कुणाचेही नाव न घेता लगावला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील शुक्रवार, 12 रोजी संवाद यात्रेनिमित्त भुसावळ दौर्यावर येत असून त्या पार्श्वभूमीवर तापी नगरातील चौधरी यांच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली.
शहरात निघणार दुचाकी
चौधरी म्हणाले की, संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरातून दुचाकी रॅली काढली जाणार आहे तसेच यावेळी अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. मंत्री पाटील यांची भुसावळातील बैठक नेहमी स्मरणात राहील अशी व्हावी यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. मंत्र्यांचे आगमन होण्यापूर्वी महात्मा गांधी पुतळा येथून घोषणा न देता, शांततेत दुपारी 3 वाजता दुचाकी रॅली काढली जाईल, असे त्यांनी सांगतिले. जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा युवक अध्यक्ष रवींद्र पाटील, शहराध्यक्ष नितीन धांडे, महिला शहराध्यक्ष नंदा निकम, पालिकेतील गटनेता उल्हास पगारे, वरणगाव पालिकेतील गटनेते राजेंद्र चौधरी, जयश्री पाटील, लता पाटील, दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, सतीश घुले, नगरसेवक सलीम हाजी पिंजारी, भागवत सावकारे, नगरसेवक इकबाल बागवान, अशोक चौधरी उपस्थित होते.

