शिक्षक पत्नीचा छळ : शिक्षक पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा


रावेर : स्वयंपाक व्यवस्थीत येत नाही शिवाय वारंवार पैशांची मागणी करून शिक्षक पत्नीचा छळ केल्याप्रकरणी शिक्षक पतीसह सहा जणांविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी कमलाबाई मुलींच्या शाळेतील शिक्षिका जयश्री संजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार शिक्षक पती संजय नारायण कुलकर्णी, सासरे नारायण गंगाधर कुलकर्णी, सासू शैलेजा नारायण कुलकर्णी, दीर विवेक नारायण कुलकर्णी, दीर उपेंद्र नारायण कुलकर्णी, नणंद वैशाली मिलिंद भावे यांच्याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराचे 25 वर्षापूर्वी लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसार वेलीवर मुलगा व मुलगी असे फुल उमलले. सुरूवातीच्या काळात संसार सुखाचा बहरला मात्र शिक्षक पतीने कालांतराने स्वयंपाक येत नाही तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याने न्यायासाठी महिला दक्षता समिती, जळगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली मात्र तेथेही वाद न मिटल्याने रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील ईस्माईल शेख करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !