अवैधरीत्या वाळूची वाहतूक : रावेरात दोन ट्रॅक्टर जप्त


रावेर : दोन दिवसांपूर्वी अवैध वाळुने भरलेले ट्रॅक्टर दंड न करता सोडल्यानंतर चर्चेत आलेल्या रावेरातील महसूल विभागाने शनिवारी दोन अवैध वाळूने भरलेले ट्रक्टर पकडले आहे. प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी खुलासे मागविण्याचे फर्मान देताच महसूल पथकाने कारवाईचा फार्स दाखविला आहे. शनिवारी सकाळी पहाटेपासून महसूलचे पथक अवैध वाळू विरुध्द कारवाई करताना दिसून आले. पहाटे पाच वाजता भोकरीकडून अवैध वाळुने भरलेले टॅ्रक्टर (एम.एच.19 बी.जी.2382) जप्त करण्यात आले. दुसरे अवैध वाळूने भरलेले विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉली धुरखेडा परीसरात पकडण्यात आले. ट्रॅक्टर चालक पसार झाल्याने कोतवाल गणेश चौधरी यांनी ट्रॅक्टर चालवत आणून रावेर तहसील कार्यालयात जमा केले. ही कारवाई मंडळ अधिकारी सचिन पाटील, विठोबा पाटील, तलाठी दादाराव कांबेळे, यासीन तडवी आदी महसूल पथकाने केली.

मंत्री जयंत पाटलांकडे तक्रार
महसूल पथकाने कर्तव्यात दिलेल्या तिलांजलीबाबत रझोदा येथील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे माजी प्रदेश सरचिटणीस आर.के.चौधरी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे महसूल पथकाबाबत तक्रार केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !