घाणेगावच्या बेपत्ता माय-लेकींचा विहिरीत आढळला मृतदेह
साक्री : दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तालुक्यातील घाणेगाव येथील महिलेसह बालिकेचा विहिरीत मृतदेह आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. सोनाबाई काशिराम खामगड (31) व त्यांची पाच वर्षाची मुलगी पूनम अशी मयतांची नावे आहेत. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. काशिराम यादव (खामगड) यांच्या खबरीनुसार निजामपूर पेालिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. माय-लेकींनी आत्महत्या केली की अन्य कारणांनी त्यांचा मृत्यू झाला याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.