धक्कादायक : चक्क पोलिस उपअधीक्षकांचे घर फोडले !
साक्री : चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीलाच थेट आव्हान थेट साक्री उपविभागाच पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या प्रगती कॉलनीतील घरातून सहा लाख 15 हजारांचा एैवज लांबवल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून वरीष्ठांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वान पथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले असून चक्क पोलिस अधिकार्याकडे झालेल्या चोरीमुळे सर्वसामान्य नागरीकदेखील आश्चर्य व्यक्त करीत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मैराळे हे कुटुंबासह बाहेरगावी गेल्याने घराला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधली.

