भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वाढदिवसानिमित्त शाखा फलक उद्घाटनासह विविध कार्यक्रम
भुसावळ- कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा उर्फ नमा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले.
श्री संत गाडगेबाबा वस्तीगृहातील गरीब मुलांना अन्नदान करण्यात आले. लक्ष्मी चौकात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश कापडे, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जाधव यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ सैनिक शकील भाई, माजी नगरसेवक अजय पाटील, युवा सैनिक मिलिंद कापडे, युवा सेना शहर अधिकारी सुरज पाटील, गोसेवक रोहित महाले, जितु पवार, डॉ.भरत महाजन, पवन बॉक्से, मुर्गेंन कुलकर्णी, सर्प मित्र किरण भाई, अबुजर शेख, पिंटू नागरे, अजय चौरसीया, शिवम चौरसिया, अंसार शाह, सचिन श्रीनाथ, कैलाश भोई, राहुल राजपूत, आदित्य शर्मा, माजी शाखा प्रमुख मनीष चौरसिया, संजय अग्रवाल, शाखा प्रमुख धीरज वरदोनकर, नितेश मिश्रा, दीपेश शर्मा, मनोहर गोठवाल, ऋषभ अग्रवाल,अलंकार मंडल चे अमोल सोनार, धनराज सोनार, सागर शिंदे, भूषण किरंगे उपस्थित होते. यावेळी जगदीश कापडे यांच्या हस्ते शाखा प्रमुख मनोज अग्रवाल, उपशाखा प्रमुख भूषण जोशी, शाखा सचिव गौरव शर्मा यांना शिव बंधन व शिवसेनेच्या भगवा देवून गौरव करण्यात आला.