राज्यातील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक
मुंबई : कोल्हापूर, सोलापूरसह राज्यातील अनेक भागात पूरामुळे उद्भवलेली बिकट स्थितीनंतर ‘महाजनादेश’ यात्रेवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, 7 रोजी महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस हे तातडीने विदर्भातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला विदर्भात चांगला प्रतिसाद मिळाला मात्र गेल्या दोन दिवसांत राज्यात पूर परिस्थिती उद्भवली तेव्हापासून मुख्यमंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांच्या संपर्कात आहेत. लष्कर, नौदल, वायुसेना, मुख्य सचिव, जिल्हा प्रशासन अशा सर्व आघाड्यांवर आढावा घेणे आणि तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्याचा मुख्यमंत्र्यांचा नित्यक्रम सुरू आहे.