मुहूर्त ठरला : जळगावात आदर्श शिक्षक पुरस्काराचे सोमवारी वितरण


जळगाव : वादात अडकल्याने रखडलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याला अखेर मुहूर्त गवसला असून सोमवार, 16 रोजी पुरस्काराचे वितरण करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत आता शिक्षक पुरस्काराचे वितरण होणार आहे. या सोहळ्यास आता कोण लोकप्रतिनिधी हजेरी लावतात तसेच टाळतात? याकडे लक्ष लागले आहे.

आरोप-प्रत्यारोपानंतर ढकलला होता पुढे कार्यक्रम
5 सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे खरे तर वितरण होणार होते मात्र लोकप्रतिनिधींनी दिलेल्या नावांवरून झालेल्या वादंगामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची तेव्हा चर्चा होती तर पालकमंत्री गिरीश महाजन यांची वेळ न मिळाल्याने हा सोहळा पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्टीकरण शिक्षण विभागाने दिले होेते मात्र सोमवारी पालकमंत्री महाजन हजेरी लावतात वा नाही ? याकडे लक्ष लागले आहे. या पुरस्कारावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर आपण काही सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ, असा पवित्रा शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी घेतल्याने पुरस्काराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


कॉपी करू नका.