बोदवडमध्ये लोकअदालतीत तीन प्रकरणांमध्ये तडजोड


बोदवड- दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवारी सकाळी 11ा वाजता लोकअदालत व मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी न्या.एस.डी.गरड होते. व्यासपीठावर बोदवड तालुका वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.अर्जुन टी.पाटील, नायब तहसीलदार पुसेकर, गटविकास अधिकारी वाघ, पंच गजानन बळीराम चौधरी उपस्थित होते. लोक अदालतीमध्ये एकूण 75 प्रकरणी तडजोडीसाठी ठेवण्यात आली मात्र केवळ फौजदारी एक व दिवाणी दोन प्रकरणांमध्ये तडजोड झाली. नायब तहसीलदार पीसेकर, अ‍ॅड.मीनल अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.के.एस.इंगळे यांनी केले. दरम्यान 18 सप्टेंबर रोजी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन बोदवड न्यायालयात करण्यात आले असून मोफत कायदेविषयक सल्ला शिबिराचा लाभ जास्तीत जास्त गरजूंनी घ्यावा, असे आवाहन न्या.गरड यांनी केले आहे.

यांनी घेतले परीश्रम
लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड.मोझे, सरकारी वकील अ‍ॅड.नवाब शेख, अ‍ॅड.आय.डी.पाटील, अ‍ॅड.चंद्रसिंग पाटील, अ‍ॅड.अमोल परदेसी, अ‍ॅड.शारदा राऊत, अ‍ॅड.तेजस्विनी काटकर, अ‍ॅड.विजय मंगळकर, अ‍ॅड.निलेश लढे, अ‍ॅड. डी.सी.प्रजापती, अमोलसिंग पाटील तसेच न्यायालयीन कर्मचारी वर्ग तहसील कर्मचारी वर्गाने परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.