साई नगर शिर्डी-विजयवाडा दरम्यान साप्ताहिक सुपर फास्ट विशेष गाडी धावणार
भुसावळ :ः मध्य रेल्वेने साई नगर शिर्डी ते विजयवाडा दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. डाऊन 07208 साप्ताहिक विशेष साई नगर शिर्डी येथून 7 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी 5.20 वाजता सुटल्यानंतर विजयवाडा येथे दुसर्या दिवशी 3.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 07207 साप्ताहिक विशेष गाडी विजयवाडा येथून 6 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवारी 10.15 वाजता सुटल्यानंतर साई नगर शिर्डी येथे दुसर्या दिवशी 9.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाडला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, तीन द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहे. पूर्णपणे राखीव असलेल्या 07208 विशेष गाड्यांचे बुकिंग सामान्य भाडे दराने 6 मार्चपासून सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

