वेल्हाळे महिला सरपंचांविरुद्ध अविश्‍वास : 10 रोजी सुनावणी


भुसावळ : तालुक्यातील विल्हाळे येथील महिला सरपंच सीमा पाटील या सदस्यांना विश्वासात घेत नाही, मनमानी कारभार करतात, सरपंच सीमा पाटील यांचे पती हे कामात हस्तक्षेप करतात आदी कारणावरून ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी गुरूवारी तहसीलदार दीपक धिवरे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावावर 10 मार्च रोजी विशेष सभेत सुनावणी होणार आहे. या प्रस्तावावर उपसरपंच राजेद्र सुरवाडे, दिनेश पाटील, पुरूषोत्तम पाटील, महेश महाजन, संध्या पाटील, कामिनी पाटील, सुरेखा सुरवाडे आणि सुषमा पाटील या सदस्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दरम्यान, बुधवार, 10 मार्च रोजी तहसीलदारांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायतीत विशेष सभा होणार असून या सभेतील निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !