यावल उपनगराध्यक्षपदी पौर्णिमा फालक यांची बिनविरोध निवड
यावल : नगरपरीषदेच्या उपनगराध्यक्षपदी पौर्णिमा राजेंद्र फालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परीषदेच्या मावळत्या उपनगराध्यक्षा रुखमाबाई भालेराव (महाजन) यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने या रीक्त झालेल्या जागेवर पौर्णिमा राजेंद्र फालक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीची सभा ऑनलाईन घेण्यात आली. या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार होते. नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी, मुख्याधिकारी बबन तडवी व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील, राकेश मुरलिधर कोलते, प्रा. मुकेश पोपटराव येवले, नगरसेवक अभिमन्यू विश्वनाथ चौधरी यांच्यासह नगरसेवक सहभागी झाले.

