दुचाकी घसरली : भुसावळचे दोघे रेल्वे कर्मचारी जखमी
भुसावळ : शहरातील भोई नगराजवळ रस्त्यानजीक पडलेल्या कचमुळे दुचाकी घसरून रेल्वेचे दोन कर्मचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली. अपघातामुळे दोघा रेल्वे कर्मचार्यांचे हात फ्रॅक्चर झाले असून पालिका प्रशासनाने या संदर्भात दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. डीआरएम कार्यालयातील कार्मिक विभागातील वैद्यकीय विभागाचे चीफ ओएस गुलाब जी.सोनवणे व सिनियर क्लर्क अविनाश सोनवणे हे मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता दुचाकीवरून जळगावहून भुसावळकडे येत असताना भोई नगराजवळ रस्त्यावर पडलेल्या कचमुळे दुचाकी घसरल्याने दोघांच्या हाताला जबर मार लागल्याने स्थानिक नागरीकांनी त्यांना रेल्वे दवाखान्यात दाखल केले. दोघांचे हात व पाय फ्रॅक्चर झाल्याने त्यांना प्लास्टर लावण्यात आले.

