किनगाव अपघात ; मयतांच्या वारसांना धनादेशाचे वाटप


किनगावनजीक पपईचा ट्रक उलटून 14 मजुरांचा झाला होता मृत्यू : वारसांना प्रत्येकी दोन लाखांची मदत

रावेर : पपईची वाहतूक करणारा ट्रक बर्‍हाणपूर-अंकलेशवर महामार्गावरील किनगावनजीक उलटल्याने 14 मजुरांचा मृत्यु झाला होता. मयताच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी दोन लाखांप्रमाणे 28 लाखांचे धनादेश तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. किनगाव अपघातात मयत झालेल्या अभोडा येथील मजुरांच्या वारसाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत करण्यात आली.

14 मयतांच्या वारसांना मदत
हुसेन शेरखा तडवी यांची पत्नी आणि मुलाचा या अपघातात मृत्यु झाला होता. त्यांना चार लाखांची मदत करण्यात आली तर समाधान वाघ (10) याचे आई-वडील आणि भावाचा या अपघातात मृत्यू झाला होता. त्यांना सहा लाखांची मदत करण्यात आली. दीपिका मोरे (9) हिचे आई, भाऊ आणि बहिणीचा या अपघातात मृत्यु झाल्याने तिला सहा लाखाची मदत करण्यात आली. संजना सपकाळे (40) यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली. आरीफा हुसेन (31) यांचा पतीचा या अपघातात मृत्यू झाल्याने त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली. अनिसा तडवी यांच्या पतीचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली. वानम वाघ (75) यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने त्यांना दोन लाखाची मदत करण्यात आली आहे. शांताबाई भालेराव (56) यांची मुलगा व सुन यांचा अपघातात मृत्यु झाल्याने त्यांना चार लाखाची मदत करण्यात आली. एकूण 14 मयतांच्या वारसांना 28 लाखांची मदत करण्यात आली आहे.


अनाथ दीपिका व खुशीच्या नावे फिक्स डिपॉझीट
आभोडा येथील दीपिका आणि खुशीच्या जीवनात आता कायमचा आनंद हिरावला गेल्याने अनाथ दोघे बहिणींच्या नावे सानुग्रह अनुदानाच्या माध्यमातुन सहा लाख रुपये त्या 18 वर्षाच्या होतील तोपर्यंत पोष्टात फिक्स डिपॉझीट करण्याचे चांगले काम तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे. यावेळी धनजंय चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, काँग्रेसचे राजूभाऊ सवर्णे, प्रल्हाद महाजन, संतोष पाटील आदी यावेळी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !