तरुणांनी खेळासोबत उद्योगाकडे वळावे : श्रीराम पाटील
रावेर : शरीर संपदेसाठी व्यायामासोबत मैदानी खेळ जसे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तरुणांनी खेळासोबत आपल्या अंगी असलेले कौशल्य वापरुन नोकरीच्या मागे न धावता उद्योगाकडे वळावे व एक दुसर्यांमध्ये स्पर्धा करताना ती विकासाची असावी व या विकासातूनच देशसेवा घडते, असे प्रतिपादन श्रीराम फांऊडेशनचे अध्यक्ष उद्योजक श्रीराम पाटील यांनी रावेर तालुक्यातील पातोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवदुर्गा क्रिकेट क्लब आयोजीत खुल्या टेनिस बॉल क्रिकेटच्या समारोपप्रसंगी केले.
रावेर संघाने जिंकला सामना
पातोंडी येथील प्रगतीशील विनोद पाटील यांच्या शिवारात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंतिम सामना रावेर येथील नॅशनल व पातोंडी येथील चॅम्पियन या संघात खेळला गेला. अंतिम सामना रावेरच्या संघाने जिंकला. विजेत्या संघाला श्रीराम पाटील यांच्याकडून 21 हजारांचे बक्षीस देण्यात आले. उपविजेत्या संघाला प्रगतीशिल शेतकरी भाऊराव पाटील व विनोद पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने 11 हजार बक्षीस देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ओम ट्रेडींगचे संचालक राजेंद्र चौधरी यांच्याकडून 2100 रुपये देण्यात आले. पंच म्हणून किशोर पाटील, गजानन सावळे यांनी काम पाहिले. बक्षीस वितरणाप्रसंगी उद्योजक श्रीराम पाटील, श्रीराम फाऊंडेशनचे सचिव स्वप्निल पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, घन:श्याम पाटील, प्रकाश पाटील, राजेश महाजन, विनोद पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी योगेश पाटील, आशु पाटील, आर्यन पाटील, हर्षल पाटील, दीपक सावळे, समाधान धनके, वैभव पाटील, नितीन सावळे, किरण पाटील, हेमंत पाटील, संजय पाटील, जितेंद्र पाटील, विश्वास पाटील यांनी परीश्रम घेतले.

