मसाकाच्या वार्षिक सभेत ऊस उत्पादक आक्रमक
पेमेंटवरून संचालकांना विचारला जाब : विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी
फैजपूर- मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत संचालक मंडळाला ऊस उत्पादकांच्या 15 कोटींच्या थकीत पेमेंट साठी शेतकर्यांच्या प्रंचड रोषाला सामोरे जावे लागले. रविवारी आयोजित सभेत शेतकर्यांनी संतप्त होत पेमेंटबाबत जाब विचारला. अध्यक्षस्थानी चेअरमन शरद महाजन होते. मधुकरच्या कार्यस्थळावर रविवारी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले. सभा सुरू होण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन करीत असताना शेतकर्यांनी आक्रमक भूमिका घेतली व उसाचे पेमेंट कधी देणार? याचा जाब संचालक मंडळाला विचारला. यावेळी चेअरमन शरद महाजन यांनी उस उत्पादकांना समजावत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला मात्र ऊस उत्पादक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी संतप्त शेतकर्यांनी थेट व्यासपीठापर्यंत धाव घेतली.