सावदा पालिकेची धडक कारवाई : थकबाकीदार सहा गाळ्यांना सील


सावदा : सावदा नगरपालिकेने थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहिम सुरू केली असून रविवारी सहा दुकानांना सील ठोकण्यात आल्याने थकबाकीदारांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. मार्च एण्डच्या पार्श्‍वभूमीवर सावदा पालिकेतर्फे थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहिम सुरू करण्यात आली आहे. पालिकेच्या वसुली पथकाकडून वसुलीवर भर देण्यात आला असून थकबाकी न भरणार्‍या गाळ्यांना सील लावले जात आहे. शहरात पालिकेच्या मालकीचे 127 गाळे असून सर्व गाळे धारकांना डिसेंबर 2020 थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या मात्र त्यानंतरही थकबाकी न भरणार्‍या बड्या थकबाकीदारांविरुद्ध मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या आदेशाने गाळ्यांना सील लावण्याची कारवाई केली जात आहे. रविवारी एक लाख 22 हजार 322 रुपयांची थकबाकी वसुल करण्यात आली. ही कारवाई अनिल आहुजा, वसुली विभागातील लिपिक अरुण ठोसरे, संध्या वाणी, आकाश तायडे, लता भांगाळे व वसुली विभागातील कर्मचारी सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !