रावेरात महिलादिनी स्त्री शक्तीचा सन्मान
रावेर : जागतिक महिला दिनानिमित्त रावेर पोलिस स्थानकात विविध क्षेत्रात कार्य करणार्या स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणेख, पंचायत समिती सभापती कविता कोळी, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल आदींची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
महिलांनी सांभाळले पोलिस ठाणे
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी पोलीस स्टेशनचा कार्यभार प्रातिनिधिक स्वरूपात महिलांच्या हातात सोपवला. पोलिस निरीक्षक म्हणून आदिवासी समाजाच्या गृहिणी चांदणी जब्बरसिंग बारेला (गारखेडा) यांना यांच्याकडे तर ठाणे अंमलदार म्हणून वर्षा प्रवीण पाटील, सीसीटीएनएसला दीपाली नितीन लहासे (केर्हाळे बु.॥), गार्ड अंमलदार मनीषा विजय गायकवाड (भोर), कारकून जयश्री अशोक शिंदे (रावेर), गोपनीय सुवर्णा जयंत भागवत (रावेर), दुय्यम अधिकारी कांता बोरा (गाजला), शारदा देविदास चौधरी, रीझर्व्ह पीएसओ संगीता सुभाष अकोले, क्राईमला सुनीता दिनकर वानखेडे (बोहरडा) यांच्याकडे एका दिवसासाठी पदभार सोपवण्यात आला.

या महिलांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, पंचायत समिती सभापती सविता कोळी, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, डॉ.योगीता संदीप पाटील, डॉ.संध्या मिलिंद वानखेडे, डॉ.सुचिता कुयते, डॉ.प्रीती साबळे, डॉ.सुनीता पाटील, डॉ.हर्षा पाटील, डॉ.अमिता महाजन, डॉ.चैताली पाटील, डॉ.यास्मीन खान, नगरसेविका नुसरत परवीन, शबाना बानो, रशीदा बी.जाकीर, मो.शाईन परवी, मुख्याध्यापिका वाशीम बानो, रीजवना बोहरी, तस्लिमा पठाण, सेविका संगीता गजरे (ग्रामीण रुग्णालय, पाल), मुख्याध्यापिका सुनीता वाणी, होमगार्ड, महिला पोलिस माधवी मोरे, महिला पोलिस रईसा तडवी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
पंचायत समितीत महिलांचा सन्मान
रावेर : जागतिक महिला दिनानिमित्त रावेर तालुका ग्रामसेवक संघटनेकडून तालुक्यातील सर्व ग्रामसेविका व पंचायत समितीच्या सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांचा वैयक्तीक सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, छाया नेमाडे, आफ्रिन तडवी, कविता बोडदे, विद्या धांडे, कविता गावीत, सरला पाटील, संध्या इंगळे, दीपाली गुल्हाने, तारू, कोल्हे, मीना तडवी यांचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला. तालुक्यातील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन संघटनेचे सचिव उदय चौधरी यांनी केले.
