भुसावळात रेल्वेच्या धक्क्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू


भुसावळ : शहरातील रेल्वे यार्डातील डाऊन लाईनवर रेल्वेचा धक्का लागल्याने 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 6 मार्च रोजी ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अनोळखीची उंची 5.2 इंच, नाक सरळ, रंग सावळा, शरीर बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे वाढलेले, चेहरा गोल तसेच उजव्या छातीवर दिल गोंदलेले आहे तर डाव्या छातीवर आर गोंदलेला आहे. अनोळखी तरुणाने अंगात गुलाबी व निळ्या रंगाचा बाईट सुट परीधान केला असून पोपट रंगाचा पेटीकोटही घातला असून गळ्यात काळ्या रंगाचा दुपट्टा तसेच पांढर्‍या रंगाचा पंचा गुंडाळला होता. अनोळखीबाबत ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याशी (02582-222338) वा हवालदार शिवलाल दहिकर (8275709375) वर संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !