कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मुक्ताई माघीयात्रा उत्सव रद्द


मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई, योगीराज चांगदेव महाराज यांचा माघी यात्रोत्सव महाशिवरात्रीला मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा होत असलातरी कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे रद्द करण्यात आला आहे. मुक्ताईनगर व कोथळी मुक्ताबाई मंदिरावर यात्रोत्सव प्रातिनिधिक स्वरुपात साजरा होईल. भाविकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून व ऑनलाईन पद्धतीने घरूनच दर्शन घेता येईल. दरवर्षीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाई व योगीराज चांगदेव महाराज या गुरु-शिक्षांच्या भेटीनिमित्त माघी कृष्ण दशमी ते महाशिवरात्रीपर्यंत भव्य-दिव्य यात्रोत्सव साजरा होतो.

कोरोना प्रादुर्भावामुळे यात्रोत्सव रद्द
राज्यभरातील शेकडो दिंड्या तसेच वारकरी यात्रोत्सवात दाखल होतात मात्र कोरोनाचा सातत्याने वाढत असलेला फैलाव पाहता जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करीत हा 8 ते 11 दरम्यान साजरा होणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !