भुसावळातील बद्री प्लॉटमधील न.पा.दवाखान्यातही व्हावे कोविड लसीकरण
भुसावळ : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला शहरात सुरूवात झाली असलीतरी गर्दी टाळण्यासाठी भुसावळ शहरातील बद्री प्लॉट भागातील पालिकेच्या दवाखान्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात करावी, अशी मागणी नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांनी पालिका मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याकडे बुधवारी निवेदन देवून केली. मुख्याधिकार्यांनी निवेदनाच्या अनुषंगाने दखल घेण्यासंदर्भात निश्चित विचार करण्यात येईल, अशी ग्वाही प्रसंगी दिली.

