कोरोनाचा विस्फोट ! : सहा रुग्णांचा मृत्यू : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 983 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 66 हजार 726 वर : एकाच दिवसात 441 रुग्णांची कोरोनावर मात : 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे तब्बल 983 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे तर आतापर्यंत कोरोनामुळे 1421 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 66 हजार 726 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 59 हजार 580 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात 441 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 222
जळगाव ग्रामीण 18
भुसावळ 57
अमळनेर 58
चोपडा 133
पाचोरा 17
भडगाव 15
धरणगाव 71
यावल 13
एरंडोल 02
जामनेर 163
रावेर 32
पारोळा 30
चाळीसगाव 102
मुक्ताईनगर 24
बोदवड 17
अन्य जिल्हा 09


24 तासात सहा रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात जळगाव शहरातील 67 वर्षीय पुरूष व 60 वर्षीय महिला, चोपडा तालुक्यातील 85 वर्षीय पुरूष, चाळीसगाव तालुक्यातील 68 वर्षीय महिला, एरंडोल तालुक्यातील 51 वर्षीय पुरूष, भडगाव तालुक्यातील 57 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. एक मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव, एक मृत्यू चोपडा तसेच एक मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव तसेच एक मृत्यू समवेदना हॉस्पीटल, जळगाव व एक मृत्यू समर्थ हॉस्पीटल, जळगाव व एक मृत्यू गोल्डसिटी हॉस्पीटल येथे झाला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !