बोदवड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी आठ कोटींचा निधी मंजूर
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना आले यश
बोदवड : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुक्ताईनगर मतदार संघासातील विविध विकास कामांसाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यात बोदवड तालुक्यासाठी आठ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
या रस्त्यांचे उजळणार भाग्य
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांनी बोदवड तालुक्यातील रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. त्यात तीन राज्यमार्गाचा समावेश आहे. रावेर-पातोंडी-पिंप्रीनांदू-नायगाव-डोलारखेडा-कुर्हा-वढोदा रस्त्यावरील पुलाचे बांधकाम, रावेर-पातोंडी-पिंपरीनांदू-नायगाव-डोलारखेडा-कुर्हा-वढोदा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, रावेर-पातोंडी-पिंपरीनांदू-नायगाव-डोलारखेडा-कुर्हा-वडोदा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, ओझरखेडा-हरताळा-सालबर्डी रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, नवे बोरखेडा-जुने बोरखेडा-उमरा-लालगोटा-हलखेडा-वडोदा-मच्छिंद्रनाथ मंदिर रस्यावरील पुलाचे बांधकाम करणे, जोंधनखेडा आश्रम शाळा-जोंधनखेडा-राजोरा-कुर्हाकाकोडा-सुळे-वडोदा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, नवे बोरखेडा-जुने बोरखेडा-उमरा-लालगोटा-हलखेडा-वढोदा मच्छींद्रनाथ मंदिर रस्त्याचे पुलाचे बांधकाम करणे, चारठाणा-मधापूरी-जोंधनखेडा-उमरा पारंबी-भोटा-कुर्हा-धुपेश्वर रस्त्यावरील लहान पुलांच्या बांधकामासह रुंदीकरण मजबुतीकरण व डांबरीकरण, पूर्णाड-पुर्णाड फाटा-खामखेडा-मुक्ताईनगर-सातोड-रुईखेडा ते जिल्हा हद्द तिघ्रा रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण, दुसखेडा-थोरगव्हाण-गाते-मस्कावद-दसनूर-निंभोरा-खिर्डी-ऐनपूर-अजंदा-पातोंडी-मोरगाव-अजनाड ते राज्य मार्ग रस्ता प्रजिमा 14 किमी 29/100 ते 35/400 ची सुधारणा करणे, दुसखेडा-थोरगव्हाण-गाते-मस्कावद-दसनूर-निंभोरा-खिर्डी-ऐनपूर-अजंदा-पातोंडी-मोरगाव अजनाड ते रामा 4 रस्ता प्रजिमाची सुधारणा करणे, खिरोदा-चिनावल-वडगाव-निंभोरा-बलवाडी-उदळी-हतनूर-बोदवड (वळण रस्त्यासह) जामठी-नांद्रा-हवेली-फत्तेपुर-तोंडापूर-वाकोद रस्ता रामा 46 च्या मोरी बांधकामासह सुधारणा करणे, वरणगाव-भानखेडा-मुक्तळ-जलचक्र-बोदवड-मनुर बु.॥-धोनखेडा ते जिल्हा हद्द रस्ता प्रजिमा 28 ची सुधारणा करणे, जामठी-लोणवाडी-धोंडखेडा-हरणखेडा-कोल्हाडी रस्ता प्रजिमा 29 ची सुधारणा करणे, कोल्हाडी-निमखेड रामा 270 ते हरणखेड चिखली मनुर खु. ते रामा 46 ते शेलवड रस्ता रा.मा. 753 एल प्रजिमा 90 च्या मोरी बांधकामासह सुधारणा करणे, कोल्हाडी-निमखेड रामा 270 ते हरणखेड चिखली मनुर खुर्द ते रामा 46 ते शेलवड रस्ता रा.मा. 753 एल प्रजिमा 907/00 ते 20/00 ची सुधारणा रुंदीकरण व हरणखेड गावानजीक संरक्षक भिंत बांधकाम करणे, कोल्हाडी-निमखेड रामा 270 ते हरणखेड चिखली मनुर खुर्द ते रामा 46 ते शेलवड रस्ता रा.म. 753 एल प्रजिमा 90 किमी 11/00 मध्ये पुलाचे बांधकाम करणे.

