चाकू हल्ल्यातील संशयीत भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ- भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात चाकू हल्ल्याप्रकरणी संशयीत आरोपी दीपक उर्फ भेय्या जीवन कलाल (18, रा.हनुमान नगर, भुसावळ) विरुद्ध गुन्हा दाखल होता. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाला होता मात्र नाहाटा चौफुलीवर येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तक्रारदार मिथिलेस सहानी (श्रीराम नगर, भुसावळ) यांनी आरोपीच्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याने आरोपीने सहान यांच्यावर चाकू हल्ला केला होता. या प्रकरणी 19 मार्च रोजी मध्यरात्री दोन वाजता बाजारपेठ पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध सुरू असतानाच सोमवारी तो नाहाटा चौफुलीवर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली. तपास हवालदार मिलिंद कंक करीत आहेत.


कॉपी करू नका.