‘अंतर्नाद’चा एक दुर्वा समर्पणाची उपक्रम व्हावा लोकचळवळ


‘गणरायास समर्पणाची दुर्वा’ उपक्रम कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांचा सूर

भुसावळ : महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा आदी थोर महापुरुषांच्या मार्गदर्शक पथावर अंतर्नादचे सुरू असलेले कार्य समाजासाठी आदर्शवत आहे आणि हा उपक्रम लोकचळवळ व्हावा असा सूर ‘गणरायास समर्पणाची दुर्वा’ उपक्रमाच्या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.वासंती महाजन प्राथमिक विद्यालयात उपक्रमांतर्गत 100 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. अशा उपक्रमांतून सामाजिक लोकचळवळ उभी राहण्यासाठी पाठबळ देण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. अध्यक्षस्थानी नगरसेवक मुकेश पाटील होते.

व्यासपीठावर यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून आरपीएफचे रीटायर्ड कमिश्‍नर रमेश सरकाटे, सामाजिक कार्यकर्ते शांताराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुले, गस संचालक योगेश इंगळे, मुख्याध्यापक गणेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख प्रदीप सोनावणे तर उपक्रमाविषयीची भूमिका मांडताना अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपेक्षित घटकांसाठी सामाजिक संवेदना जपून सामाजिक समरसता जोपासत अंतर्नादने यंदा कुर्‍हा येथील उर्दू शाळेपासून ह्या वेळेस उपक्रमाला सुरवात करून समाजात आदर्श उदाहरण निर्माण केल्याचे सांगितले.

समाजोपयोगी उपक्रमाच्या कायम पाठीशी -मुकेश पाटील
समाजासाठी कार्य करण्याची अंतर्नाद प्रतिष्ठानची धडपड असते. गणेशोत्सवात होणारा खर्च कमी करुन गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या वर्षी आम्ही ही मंडळात लहान मूर्ती बसवून बचतीच्या पैश्यात ह्या विद्यार्थ्यांना मदत केली. अंतर्नाद पक्रमाच्या पाठीशी नेहमी उभे असल्याचे नगरसेवक मुकेश पाटील यांनी सांगितले.

मेहनत करून ध्येयापर्यंत पोहचा -रमेश सरकाटे
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन प्रवाहात आणण्यासाठी अंतर्नाद प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पदच आहे, असे रमेश सरकटे यांनी सांगितले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना जवाबदारीची जाणीव त्यांनी करून दिली.विद्यार्थ्यांनी अभ्यास आणि मेहनत करून आई-वडील आणि गुरुजणांचे स्वप्न सत्य करून ध्येयापर्यंत पोहचा असे सुचविले. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.

प्रगती केल्यास उपक्रमाचा हेतु साध्य -शांताराम पाटील
विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन प्रगती केल्यास उपक्रमाचा हेतू खर्‍या अर्थाने साध्य होईल, असे शांताराम पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप उपक्रमांतून सामाजिक चळवळ उभी राहण्याची गरज आहे मात्र त्यासाठी सर्वांचे सहकार्य व पाठबळ आवश्यक असल्याचे समाजसेवक ज्ञानेश्वर घुले म्हणाले. सूत्रसंचालन तेजेंद्र महाजन तर आभार प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी मानले. यावेळी प्रा.श्याम दुसाने, सचिन पाटील, भूषण झोपे, समाधान जाधव शिक्षकवृंद पुष्पा चौधरी, अर्जुन मेढे, कविता लोखंडे, मनीषा गांधेले, किशोर माचवे आदी उपस्थित होते.

दात्यांच्या पाठबळातून 250 विद्यार्थ्यांना मदत
‘गणरायास समर्पणाची दुर्वा’ या उपक्रमांतर्गत दात्यांच्या पाठबळातून अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे शहरासह ग्रामीण भागातील 250 गरजू विद्यार्थ्यांना गरजेनुसार दप्तरे, पाट्या, वह्या, पेन, पेन्सील इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमास मुकेश पाटील, निलेश रायपुरे, हर्षद महाजन, रमेश सरकटे, देव सरकटे, प्रा.भाग्यश्री भंगाळे, अनिल पेपर्स जालना, भूषण झोपे, आनंद बुक डेपो, चेतन गनेरकर यांनी सहकार्य केल्याचे संदीप पाटील म्हणाले.


कॉपी करू नका.