मुंबई ते सुलतानपूर दरम्यान विशेष गाडी धावणार


भुसावळ : मध्य रेल्वेने मुंबई ते सुलतानपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतल आहे. डाऊन 02143 लोकमान्य टिळक टर्मिनस-सुलतानपूर सुपरफास्ट विशेष (साप्ताहिक) गाडी 21 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी 3.50 वाजता सुटेल आणि सुलतानपूरला दुसर्‍या दिवशी 6.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला डाऊन दिशेला नाशिकरोड, मनमाड, भुसावळ व खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02144 अप विशेष गाडी 23 मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत सुलतानपूर येथून दर मंगळवारी 4.05 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसर्‍या दिवशी 7.25 वाजता पोहोचेल. अप दिशेला खंडवा, भुसावळ, मनमाड व नाशिक रोड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला भोपाळ, बीना, झांसी, उरई, कानपूर, लखनऊ, निहालगड, मुसाफिरखाना स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !