पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार
भुसावळ : डाउन 02131 पुणे-जबलपूर साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार 6 एप्रिल ते 29 जूनदरम्यान वाढविण्यात आला आहे. अप 02132 जबलपूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडीचा विस्तार 5 एप्रिल ते 28 जूनदरम्यान वाढविण्यात आला आहे. 02131/02132 पुणे-जबलपूर-पुणे विशेष गाडीच्या वेळेत, थांब्यात व संरचनेत कोणताही बदल झालेला नाही. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

