साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुढील सूचना मिळेपर्यंत साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. डाऊन 07418 विशेष गाडी 7 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर बुधवारी साईनगर शिर्डी येथून 7.35 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी तिरुपतीला 10.10 वाजता पोहोचणार आहे. डाऊन दिशेला मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 07417 विशेष गाडी 6 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवारी तिरुपती येथून 8.30 वाजता सुटेल व साईनगर शिर्डीला दुसर्‍या दिवशी 10.45 वाजता पोहोचणार आहे. अप दिशेला मनमाड सह कोपरगाव, मनमाड, नगरसोल, औरंगाबाद, जालना, परतूर, परभणी, पूर्णा, हजुर साहिब नांदेड, धर्माबाद, बसार, निजामाबाद, कामरेड्डी, सिकंदराबाद, लिंगमपल्ली, विकाराबाद, तंदूर, चित्तापूर, यादगीर, रायचूर, मंत्रालय रोड, अडोनी, गुंटकल, गुट्टी, ताडीपत्री, मुद्दनुरु, येर्रागुंटला, कडप्पा, रजमपेटा, कोडुरू आणि रेनिगुंटा (केवळ 07417 साठी) स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, आठ शयनयान, आठ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पेंट्री कार जोडण्यात येईल. केवळ आरक्षीत तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !