हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण : कलिम शेख जाळ्यात


भुसावळ : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत दीनदयाळ नगरात चाकूच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या कलिम शेख सलीम शेख (30 रा.दीनदयाळ नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी सोमवारी अटक केली. सहा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. सोमवारी दुपारी 12.45 वाजता आरोपी भुसावळ शहरातील दीनदयाळ नगर भागात एक लोखंडी चाकू घेऊन हद्दपारीचे उल्लंघण करीत दशवत माजवत असल्याचे कळाल्याने त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, समाधान पाटील, तुषार पाटील, रवींद्र बिर्‍हाडे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्र भालेराव, प्रशांत परदेशी आदींनी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !