मद्यधूंद महिलेकडून पोलिसांना धक्काबुक्की


नरडाणा : मद्यधूंद महिलेसह सोबतच्या पुरूषाने पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावर घडली. दोन्ही संशयीत दीर-भावजयी असल्याचे बोलले जात आहे. नरडाणा टोलनाक्याजवळ हा धक्कादायक प्रकार घडला. भररस्त्यात दारु पिऊन संबंधित महिलेने धिंगाणा घातला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्याची विचारपूस करण्यासाठी पोलिस आल्यानंतर महिलेने पोलिसाची कॉलर पकडत धक्काबुक्की केली तसेच महिला अधिकार्‍यालाही अरेरावी करण्यात आली. पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आणि पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी नरडाणा पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !