मारूळ शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
शाळेच्या आवारात घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
यावल- तालुक्यातील मारूळ येथील जिल्हा परीषद उर्दू शाळा क्रमांक दोनमधील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून शाळेच्या आवारात सर्वत्र घाण साचल्यानंतरही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश करावा कसा? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावत आहे. या संदर्भात पालक सभेत आरपीआय आठवले गटाचे मारूळ येथील शाखाध्यक्ष राजु रमजान तडवी यांनी शिक्षक वर्गास जाब विचारला. शिक्षण विभागाने लक्ष देवून समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.