भुसावळातील बद्री प्लॉटमधील उपकेंद्रात कोविड लसीकरणाला प्रारंभ


भुसावळ : पालिकेच्या माध्यमातून शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू पालिकेच्या बद्रीप्लॉट भागातील उपकेंद्रात सोमवारपासून लसीकरणाला सुरूवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. बद्रीप्लॉट भागातील लसीकरण केंद्रावर नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांनी मंडप टाकून नागरीकांना सुविधा उपलब्ध करून दिली तसेच लसीकरणासाठी आलेल्यांना चहा, पाणी व ग्लुकोज बिस्किट वाटप केले. ज्या वयोवृध्द नागरीकांना लसीकरण केंद्रापर्यंत येणे शक्य नाही, अशांसाठी वाहनांची व्यवस्थाही केली जात आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढीला मोठी मदत होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !