मनमाड-सिकंदराबाद विशेष गाडी काचीगुडा स्थानकापर्यंत धावणार


भुसावळ : मनमाड-सिकंदराबाद विशेष गाडीच्या टर्मिनलमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. सिकंदराबाद स्टेशन येथे 17 ते 24 मार्चदरम्यान ऑटोमॅटिक कोच वॉश प्लांटचे कार्य केले जात असल्याने काही विशेष गाड्यांच्या प्रस्थान आणि गंतव्य स्टेशनमध्ये तात्पुरता बदल करण्यात आला आहे. डाऊन 07063 मनमाड-सिकंदराबाद विशेष गाडी 16 ते 23 मार्चदरम्यान काचीगुडा स्टेशन येथे जाईल.
अप 07064 सिकंदराबाद-मनमाड विशेष गाडी 17 ते 24 मार्चदरम्यान काचीगुडा स्टेशन येथून आपल्या नियमित वेळेत प्रस्थान करेल. प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !