चोरीच्या आठ दुचाकींसह दोघे चोरटे साक्री पोलिसांच्या जाळ्यात


साक्री : साक्री परीसरातील दुचाकींची चोरी करणार्‍या दोघा भामट्यांच्या साक्री पोलिसांनी मुसक्या आवळत त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. रमेश दयाराम हाळनर (रामपुरा, ता.मालेगाव, जि.नाशिक) व सजन देवबा सोनवणे (भडगाव, ता.साक्री, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी रमेश हाळनरने साक्रीसह पिंपळनेर, नेर, नामपूर व कुसुंबा परीसरातून दुचाकींची चोरी करीत त्या सजन सोनवणे यास विकल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली आहे. ज्यांची दुचाकी चोरी झाली आहे त्या तक्रारदारांनी साक्री पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिनेश आहेर, बी.बी.नर्हे, आर एस.जाधव, रायते, संजय शिरसाठ, विजय पाटील, जगदीश अहीरे, राज पाटील आदींनी केली. तपास हवालदार आर.एस.जाधव करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !