अंनिस शाखा भुसावळ उपाध्यक्षपदी भगवान निरभवणे
भुसावळ : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती भुसावळ शाखा उपाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते भगवान निरभवणे यांची निवड करण्यात आली.अंनिस बुवाबाजी संघर्ष विभागाचे जिल्हा सचिव अरुण दामोदर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. निरभवणे हे गेल्या अनेक वर्षांपासून अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे काम करीत आहे. तसेच ते इतर क्षेत्रातही समाज प्रबोधनाचे काम करीत असल्याने त्यांची शाखा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी शाखाध्यक्ष शांताराम जाधव, तालुकाध्यक्ष शामकुमार वासनिक, शशीकांत रायमुळे, राहुल कुचेकर, अंजना निरभवणे आदी उपस्थित होते.
