नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 16 मे रोजी


जळगाव : केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव (भुसावळ), जि.जळगाव येथील इयत्ता सहावीच्या 2021-22 प्रवेशा करीता होणारी निवड चाचणी परीक्षा 10 एप्रिल ऐवजी 16 मे 2021 रोजी आयोजित करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणामुळे परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सर्व संबधीत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, अध्यापक, पालक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षेचे प्रवेश पत्र त्याच वेबसाईट navodaya.gov.in या संकेतस्थळावरून डाउनलोड करून घ्यावे. अधिक माहितीसाठी 9404900916 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !