माजी नगरसेवक निकी बत्रा यांना कोरोना


भुसावळ : भुसावळातील माजी नगरसेवक निकी रमेश बत्रा यांना कोरोनाची लागण झाली असून याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. बद्री प्लॉटमधील दवाखान्यात त्यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. तब्येत उत्तम असून काळजी करण्याचे काम नाही शिवाय आतापर्यंत केलेल्या कर्मावर विश्वास असल्यामुळे तब्येतीला काही होणार नाही, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या काही दिवस होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या तीन दिवसात जे-जे सहकारी माझ्या संपर्कात आलेले असतील त्यांनी स्वतःहून टेस्ट करून घ्यावी व तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन निकी बत्रा यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !