मध्य रेल्वेने वर्षभरात 58 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली


भुसावळ : मध्य रेल्वेने गतवर्षाच्या 1 एप्रिल 2020 ते 13 मार्च दरम्यान विविध क्षेत्रातील गरजा भागविण्यासाठी 57.94 दशलक्ष टन मालाची वाहतूक यशस्वीरित्या केली. गेल्या तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबर 2020, जानेवारी आणि फेब्रुवारी 2021, मध्य रेल्वेने माल वाहतुकीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सातत्याने टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साध्य केली आहे.

विविध मालांची केली वाहतूक
मध्य रेल्वेने डिसेंबर 2019 मध्ये केलेल्या 5.72 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत डिसेंबर 2020 मध्ये 5.87 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे (2.72 % वाढ), जानेवारी 2020 मध्ये केलेल्या 5.96 दशलक्ष टन माल वाहतुकीच्या तुलनेत जानेवारी 2021 मध्ये 6.16 दशलक्ष टन मालवाहतूक (3.4 % वाढ) आणि फेब्रुवारी 2020 मध्ये कलेल्या 5.80 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या तुलनेत फेब्रुवारी 2021 मध्ये 5.93 दशलक्ष टन (2.2 % वाढ) मालवाहतूक केली आहे. मध्य रेल्वेने अखंडित वीज पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी 28.72 दशलक्ष टन कोळशाचा पुरवठा विविध वीज प्रकल्पांना केला आहे. शेतकर्‍यांच्या हितासाठी 1.54 दशलक्ष टन धान्य आणि साखर, 3.07 दशलक्ष टन खते आणि 0.58 दशलक्ष टन कांद्यांची वाहतूक केली आहे; याशिवाय 4.82 दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादने, 1.74 दशलक्ष टन लोखंड आणि पोलाद, 5.52 दशलक्ष टन सिमेंट, 8.96 दशलक्ष टन कंटेनर वॅगन्स आणि 2.99 दशलक्ष टन डी-ऑईल केक (कडबा) आणि इतर वस्तूंची वाहतूक केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !