यावल तहसीलचा अतिरीक्त कारभार रवींद्र पाटील यांच्याकडे


यावल : यावल तहसीलदार महेश पवार 18 मार्च ते 1 एप्रिल 2021 पावेतो वैद्यकीय रजेवर असल्याने त्यांच्या रीक्त पदाचा पदभार महसूल नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. रवींद्र पाटील यांनी कार्यभार सांभाळून तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळावा तसेच शेतकरी,शेतमजूर व सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडीअडचणी सोडवाव्यात, असेही आदेशात नमूद आहे. महसूल जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार पंकज लोखंडे यांनी याबाबत आदेश काढले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !