मुक्ताईनगरात सेनेचा गटविकास अधिकार्यांसह बांधकाम अभियंत्यांना घेराव
मुक्ताईनगर- अटल विश्वकर्मा योजने अंतर्गत खर्या बांधकाम मजूरांना लाभ मिळावा यासाठी नोंदणी केंद्र मुक्ताईनगर नगरपंचायत व तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायती स्तरावर सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी हजारो बांधकाम मजुरांसह गटविकास अधिकारी व बांधकाम अभियंत्यांना घेराव घालून आंदोलन केले संपूर्ण राज्यात अटल विश्वकर्मा योजने अंतर्गत सदैव वंचित राहिलेल्या बांधकाम मजुरांना शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा म्हणून राज्यभर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी चे आवाहन करण्यात आले होते, तशी नोंदणी अनेक मजुरांनी केलीदेखील मात्र त्यांना आजतागत शासन स्तरावरून काहीच पत्रव्यवहार संबंधीत मजुराशी झालेला नाही, उलट गेल्या येत्या विधानसभा निवडणुकीला समोर ठेवत गेल्या आठवड्यात लोकप्रतिनिधींच्या एका खाजगी आयटीआयमध्ये नोंदणी सुरू करण्यात आली होती मात्र ही नोंदणी अचानक बंद करण्यात आली आहे, शहर व तालुक्यातील अजूनही हजारो मजूर या नोंदणी पासून वंचित आहेत त्यामुळे योजनेच्या जी. आर (माहितीपत्रक)नुसार सदर नोंदणी केंद्र हे नगरपंचायत व तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर करण्यात यावी यासाठी ठिय्या आंदोलन करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यांचा आंदोलनात सहभाग
जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड.मनोहर खैरनार, विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, अल्पसंख्यांक संघटक अफसर खान, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, तालुका संघटक प्रवीण चौधरी, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी उपतालुका प्रमुख राजेंद्र तळेले, शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, नगरसेवक संतोष मराठे, देवानंद वंजारी, संदीप बगे, प्रशांत भोलाणे, आकाश सापधरे, संतोष माळी, कैलास वंजारी, सुभाष माळी, बाळा भालशंकर, राजेंद्र कापसे, योगेश काळे, मनोज मराठे, सोपान तायडे यांच्यासह असंख्य शिवसैनिक तसेच गेल्या दोन दिवसांपासून नोंदणी व्हावी या आशेने दाहीदिशा भटकणारे बांधकाम मजूर उपस्थित होते.