शिक्षकाची तापी पात्रात आत्महत्या


अज्ञात आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा संशय

शिरपूर : व्यवसायाने शिक्षक असलेल्या राजेंद्र भानुदास पाटील यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदेजवळ तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. आजाराने कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. तापी नदी पुलावर दुचाकीसह उपचाराच्या फायली व कागदपत्रे शनिवारी सकाळी आढळली आहेत. राजेंद्र भानुदास पाटील (रा.विंचूर, ह.मु.शिरपूर) व तालुक्यातील पळासनेर येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक असलेल्या राजेंद्र पाटील यांचा शोध सुरू असताना शनिवारी सकाळी नदीपात्रात एक मृतदेह आढळला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. तापी पुलावर मोटरसायकलसह उपचाराचे कागदपत्रे मिळुन आल्याने अज्ञात आजाराला कंटाळून राजेंद्र पाटील यांनी तापी नदीत उदी घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !