यावलमध्ये शासकीय हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन


यावल : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने ंतर्गत (नाफेड) हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ नुकताच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आमदार शिरीष चौधरी यांच्याहस्ते झाला. प्रसंगी बाजार समितीचे सभापती तुषार
पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी यांनी काटापूजन केले.

हरभरा खरेदीस प्राधान्य
नाफेडच्या हमीभाव हरभरा खरेदी केंद्रांतर्गत एक हजार 770 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. एका शेतकर्‍याकडून 25 क्विटंल हरभरा खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती कोरपावली विकास सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत
फेगडे यांनी दिली. शासनाच्या वतीने महाराष्ट्र माकेर्टींग फेडरेशनच्या वतीने यावल तालुक्यातून यंदा एकूण 25 हजार क्विंटल हरभरा
खरेदीचे उद्दिष्ट आहे.


यांची होती उपस्थिती
या प्रसंगी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तुषार पाटील, उपसभापती
उमेश प्रभाकर पाटील, संचालक पुंजो पाटील, संचालक सत्तार तडवी, डॉ.नरेंद्र कोल्हे, भााजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, बारसु नेहते, राकेश फेगडे व सर्व संचालक मंडळ, शरद कोळी, संतोष खर्चे, पप्पू जोशी उपस्थित होते. सचिव स्वप्नील सोनवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !