वसीम रीझवीविरुद्ध कठोर कारवाई करावी


निंभोरा पोलिसात मुस्लीम बांधवांनी दिले निवेदन

खिर्डी : धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करणार्‍या शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रीझवीचा निषेध करीत त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी खिर्डी व निंभोरा येथील इस्लाम धर्मीय बांधवांनी निंभोरा पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली. संपूर्ण देशात वसीम रीझवीविरुद्ध विविध राज्यात गुन्हे दाखल झाले असून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. सहाय्यक निरीक्षक स्वप्नील उन्नवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खिर्डी येथील अल्ताब बेग, अस्लम शेख, झाकीर पिंजारी, साबीर बेग, शेख सलमान, शेख कय्युम, शब्बीर शेख, जावेद खान, शेख फरीद, निंभोरा येथील दस्तगीर खाटीक आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !